महाराष्ट्र वेदभुमी

रा. जि. प. शाळा चोरढे मराठी येथे उत्साहात साकरला जागतिक महिला दिन

प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा

      शनिवार  ( ८ ) मार्च. जागतिक महिला दिन रा. जि. प. शाळा चोरढे मराठी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महिला आहेत म्हणून आज आपले घर चालतं आणि इतर सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. दिवसभर घरात कष्ट करत राहून महिला घर चालवत असतात. या महिलांना एक दिवस आनंददायी वातावरण निर्माण व्हावं, यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी शाळा महिलांसाठी खास संगीत खुर्ची, महिला मार्गदर्शन शिबिर राबवले . प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलांना पैठणी साडी भेट देऊन गौरविण्यात आले . तरी या आनंददायी वातावरणात सहभागी होण्यासाठी ६२ महिला उपस्थित होत्या. सरपंच तृप्ती घाग, उपसरपंच चंद्रकांत वाघे, ग्रामपंचायत सदस्य दैवत दूकले , रुपाली महाडिक, दीपा आंबलिकर ग्रामसेवक चेतन मगर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुकन्या दुकले उपाध्यक्ष ,सदस्य , अंगणवाडी ताई, आशा वर्कर यांनी आपली उपस्थिती  दर्शविली. 

                 सर्व महिलांना मेन रोड पासून वाचत गाजत लेझीम पथकाच्या साह्याने व गुलाब पुष्पांजलीचा वर्षाव करण्यात शाळेत उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुकन्या दुकले यांस कडून गणपतीची फ्रेम शाळेला भेट स्वरूपात देण्यात आली. ग्रामपंचायतीतर्फे वेफर्स, समोसा असा अल्पोपहार देण्यात आला. यावेळी महिलांसोबत ग्रामस्थांनी शिक्षकांचा सत्कार केला. महिलांना मार्गदर्शन करताना प्लास्टिक , महिला सक्षमीकरण व इतर बाबीं बाबत माहिती सांगण्यात आली. यानंतर सर्व महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलांना पैठणी साडी भेट देण्यात आली. सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला बक्षीस स्वरूपात आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. खेळ खेळून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू स्वरूपात मिळाली याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. महिला दिनानिमित्त महिलांना आनंद मिळवून शाळेच्या वातावरणाशी समरूप होता आले. शिक्षक व माता पालक यांच्याशी अशा उपक्रमातून समन्वय साधला गेला. शाळा चोरढे मराठी व ग्रामपंचायत चोरढे यांनी संयुक्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत महिलांनी आभार मानले. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संगीता भगत, विजय जाधव, राजेंद्र नाईक, प्रतिभा वर्तक, रमेश सुभेदार, नितेश राऊत जयश्री पंची यांनी नियोजन केले. गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post