महाराष्ट्र वेदभुमी

आंतरराष्ट्रीय महिला दिनावर महिलांचा सन्मान

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालाजी अण्ड सायंस रामटेक येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्य ८ मार्चला कार्यक्रम आयोजीत केला...

कार्यक्रमाचे उद्‌घाटन संस्कृत विद्यापीठाच्या डॉ. ललिता चंद्रात्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन टेक्नोडीअन २५ ने केले... यावेळी प्रामुख्याने विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टणकर, आयक्यूएसी स्मन्वयक डॉ. यशवंत जिभकाटे, डॉ. संजय बोरीकर, महिला समन्वयक डॉ. शिल्पा आष्टणकर सहित सफाई महिला कर्मचारी व  महिला प्राध्यापक उपस्थित होत्या... 

डॉ. चंद्राते यानी महिला विषयी  कविता सादर केली व म्हणाल्या की  महिला आई, पत्नी, बहिन असे विविध रोल निभावतात... समाजा करिता व परिवार करिता प्रचंड मेहनत करतात... महिला भारता सोबत जगात महत्वाच्या जबाबदारी संभाळत आहे... महिलांचे गुलाबाचे फुल देवून स्वागत केले... विविध स्पर्धाचे आयोजन केले गेले.सफाई महिलाना भेट वस्तु देण्यात आली... डॉ. मीनाक्षी चौरगडे,डॉ. स्नेहल मालोदे, प्रा. कल्पना ठाकरे, प्रा.अंजली नरड, प्रा.सरोज शंभरकर, प्रा.शीतल काठीकर यांचा यशस्वी महिला म्हणून गौरव करण्यात आला... कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किट्सचे सचिव श्री वी. श्रीनिवास राव, श्री प्रणव व प्राचार्य अविनाश श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनात महिला प्राध्यापक यांनी प्रयत्न केले... प्रस्तावना डॉ. शिल्पा आष्टणकर, संचालन प्रा. अंजली नरड व धन्यवाद प्रा.शिल्पी बोस यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post