बंद पडल्यास चालू करण्यासाठी प्राधान्य द्यावे..
पोषक वातावरणमुळे मगरिंची ठाण - प्राणी प्रेमी शंतनू कु्वेस्कर
माणगाव :- (नरेश पाटील) : वॉर्ड क्र. 16 खांदाड तलाव भागात मगरिंचे वास्तव्य असल्याने पथेदिवे संख्येत वाढविण्याची नितांत गरज आहे... मोजक्या पथदिवेची सोय असल्याने रस्त्याच्या काही अंधार भागत मगर तलावकाठी व रस्त्यावर अधून मधून विशेषकरून काळोख होताच फिरत असते तसेच रस्ता ओलांडून मानवी वस्ती भागात जात असते... तर या रस्त्यावर वाहन ये जा करणाऱ्यांना मगरीचे दर्शन होत असते असे भिती दायक दृश्य या सर्व बाबींमुळे या भागात पथदिवे संख्या वाढविण्याची गरज बनली आहे.... बाळा पोवार, सौं. शिंदे, वालेराव यांच्या निवास जवळची वर्दळ रस्ता, पायवाट रस्ते अश्या ठिकाणी पथदिवेची गरज आहे... वालेराव यांच्यामागे राहत असलेल्या नऊ,दहा कुटुंबांना रात्रीच्यावेळी ये जा करताना मोबाईल टॉर्च प्रकाशासाठी आधार घ्यावे लागते..
याभागत जर पथदिवे बंद पडल्यास तात्काळ दुरुस्ती करण्याचे प्राधान्य न. पंचायतने घेण्याचीही गरज आहे. तसेच बंद पडणारा लाईट दुरुस्त करण्यास होण्यास अनेक महिन्यांचा कालावधी लागत असल्याने येथील तलाव भागात राहत असलेल्या निवासी लोक यांना पथदिवे समस्याना सामोरे जावे लागत आहे तरी न. पंचायतने येथील पथदुरुस्थीकरीता प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे..
दरम्यान तलाव भागात पोषक वातावरण असून मगर वास्तव्य ठाण मांडून आहे... या तलावात भरपूर मासे, बेडूक, खेकडे, गटार नाल्यातून येणारा सांडपाणी, नाशाडी पदार्थ यामुळे येथे मगरीचे वास्तव्य राहिल्याचे मत प्राणीप्रेमी, अभ्यासाक शंतनू कु्वेस्कर यांनी मत व्यक्त केलेय.. दुसरीकडे गेली दोन वर्ष मगर याठिकाणी आहे तर आता ते सर्व मोठी वाढ होऊन पाण्यात व बाहेर पडत असतात. दरम्यान तलावपासून अंदाजे 100 मी अंतरावर काळ नदी त्याचबरोबर गोद नदीही आहे...
