दक्षीण मानेगावमधील गर्रा कक्ष क्र.४८१ मधील घटना
मानव-वन्यप्राणी संघर्ष थांबता थांबेना...!
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- शेतातून काम आटोपून व बकऱ्या चारून घरी परत येत असताना वाघाने हल्ला चढविला आणि त्यात शेतकरी गंभीर स्वरूपात जखमी झाला... घटना देवलापार वनपरिक्षेत्रातील दक्षिण मानेगाव जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली... कपुरचंद जुनेलाल कोवाचे (वय ५५) रा. गर्रा असे जखमीचे नाव असून, त्याच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे...
देवलापार वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषीकेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना दक्षिण मानेगाव बिटमध्ये घडली... जखमीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे...
देवलापार परिसरात सध्या वाघाची दहशत वाढली आहे...पोलिस गावाच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले... कपूरचंद कोवाचे हे शेतमजूर असून, ते बकऱ्या चारण्यासाठी व लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते, अशी माहिती वन विभागाने दिली आहे...
ते शेतकरी असून, शेतातून घरी परत येताना ही घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली...
देवलापार आदिवासीबहुल भाग असून जंगलास लागून आहे... वाघाच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत... मानव-वन्यप्राणी संघर्ष थांबविण्यासाठी नेते तसेच नागरिकांनी अनेक आंदोलने केली... परंतु, योग्य कार्यवाही झाली नाही... अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही... असे नागरिकांचे म्हणणे आहे तर, जंगलात मानवी हस्तक्षेप वाढतच आहे... त्यामुळे हिंस्र प्राण्यांचे हल्ले घडत आहेत, असे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे...
नागरिकांनी त्यांना लगेच देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले... प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले... त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली... माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली...
