पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर) : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच खऱ्या अर्थाने उन्हाळा जानवू लागला असुन तापमानाचा पारा ३९ अंशा पर्यंत गेला असुन तो ढगाळ वातावरणामुळे ४० अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने जनता पूर्णपणे हैराण झाली असुन शरीराचा दाह कमी करण्यासाठी जनता शितपेय, ज्यूस, कलिंगड, याला अधिक पसंती देत असुन यामुळे यांची मागणी अधिक वाढली असल्याचे दिसून येत आहे...
वाढते प्रदूषण व सततच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाने राने वने ओस पडू लागली असुन रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या तापमाणामुळे नागरिक पूर्णपणे हैराण होत आहेत. यामुळे शरीराला गारवा मिळण्यासाठी शितपेय, ज्यूस, कलिंगड याकडे लोकांचा कळ वाढतांना दिसत आहे...
आताच उन्हाचा पारा ३९ अंशावर वर गेला असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. भरमसाठ वृक्षतोड व दिवसेंदिवस लावण्यात आलेले वनवे यामुळे परिसर व रस्ते आग ओकतांना दिसत आहेत.प्राणी ही सावली व डबके यांचा आधार घेत आहेत तर दुपारच्या वेळी बाजारपेठ ही ओस पडलेली दिसत आहे.तसेच प्रचंड उष्णतेमुळे शेतीची मशागतीची कामे करणारा शेतकरी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत व संध्याकाळी ४ वाजल्या नंतर शेतावर जात आहे. यामुळे शेतीची कामे ही खोलंबली आहेत. या सर्व दाहक परिस्थिती पासुन बचाव करण्यासाठी नागरिक थंडगार शितपेय, लिंबू सरबत, लस्सी, कोकम सरबत उसाचा रस, कलिंगड यांचा आधार घेत आहेत...