आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड मंडळातर्फे रविवार दिनांक : ३० मार्च २०२५ रोजी ही पालखी मुलुंड (पूर्व) येथील गावांमध्ये फिरून सोमवार दिनांक ३१ मार्च ते शनिवार दिनांक : ५ एप्रिल २०२५ या कालावधीत मुलुंड ते श्री क्षेत्र कार्ला लोणावळा अशी पदयात्रा असून पालखी सोहळ्याचे यंदाचे हे २५ वे वर्ष आहे...
सोमवारी ३१ मार्चला सायं. ४ वाजता श्री तुंगवतेश्वर मंदिर - राजे संभाजी मैदान,मुलुंड (पुर्व) मुंबई येथून सदर पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे...
या सोहळ्यानिमित्त महाप्रसाद (भंडारा) मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ला मुलुंड येथील तरुण उत्कर्ष मंडळाच्या मैदानात सांय : ७ ते १० या वेळेत होणार आहे...
या सोहळ्याच्या माध्यमातून कार्ला येथे समाजातील लोकांसाठी भक्त निवास उभारण्यासारखा चांगला उपक्रमही या मंडळातर्फे राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे...
यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी असल्यामुळे भाविकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसून येत आहे असे "आई एकविरादेवी भक्त मंडळाचे धडाडीचे अध्यक्ष श्री.कैलास रघुनाथ पाटील साहेब यांनी दिली...

