महाराष्ट्र वेदभुमी

जनता दरबार मुलुंड पोलिस ठाणे झोन 7

 


प्रतिनिधी:( सतिश वि.पाटील):  दिनांक: २९मार्च २०२५ रोजी मुलुंड पोलिस ठाण्याच्या आवारात सकाळी ११:00 वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते... यामध्ये पोलीस ठाण्यात दाखल व प्राप्त झालेल्या एफ.आय.आर ,एन.सी तसेच तक्रार अर्जातील एकूण ७० महीला /पुरूष तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते... त्यापैकी एकूण १८ महीला व १४ पुरूष असे एकूण ३२तक्रारदार मुलुंड पोलिस ठाणे येथे हजर होते .यात ११जेष्ठ नागरिक हजर होते...

सदर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक मा.कोकाटे (जनसंपर्क),पोलिस निरीक्षक मा.चव्हाण( सायबर) व इतर पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.उपस्थित तक्रारदार यांच्या समस्यांबाबत बाबत दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून चर्चासत्र घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आले...यात घरगुती, व्यवसायिक, मालक - भाडेकरू यांचा समावेश होता... हरवलेल्या वस्तूमध्ये पाच मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले... मुलुंड मधील नागरिकांचा देखील या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.. पोलिस व जनता यातील दरी या कार्यक्रमातून दूर करण्याचे काम मुलुंड पोलिस ठाणे अनेक वर्ष अविरत करीत आहेत... मुलुंड पोलिस ठाणे वरिष्ठ यांच्या  संकल्पनेतुन कार्यक्रम राबविण्यात येतो...

Post a Comment

Previous Post Next Post