महाराष्ट्र वेदभुमी

रोहा प्रा.शिक्षक सहकारी पतपेढीकडून कै.शितल बामुगडेंच्या वारसास सभासद सानुग्रह धनादेश सुपूर्द


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर) : रोहा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ही रायगड जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षक सहकार पतसंस्था आहे. शिक्षकांच्या आर्थिक गरजा ची पूर्तता करण्यासाठी अल्प दरात संस्थेकडून स्वनिधी व ठेव रकमेतून कर्ज दिले जाते...

   एखाद्या सभासदाचे निधन झाल्यास  झालेले दुःख,त्याच्या निधनामुळे कुटुंबात  निर्माण झालेली पोकळी भरून निघणे शक्य असते. सभासदाच्या दुःखद निधनामुळे कुटुंबाला झालेल्या दुःखावर फुंकर मारण्याचा छोटासा प्रयत्न सानुग्रहाच्या स्वरूपात संस्थेने चालू ठेवलेला आहे... 

 एखाद्या सभासदाचे दुःखद निधन झाल्यास, संस्थेकडून त्याच्या कुटुंबास, वारसास मदत म्हणून रु.एक लाख रक्कम सभासद मृत्यु फंड योजने अंतर्गत सानुग्रह  स्वरूपात दिले जाते...

  संस्थेच्या सभासद कै. शितल अशोक बामुगडे (टेंबे मॅडम )यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. संस्थेच्या वतीने त्यांचे वारस  श्री जितेंद्र शिवाजी टेंबे ( नायब तहसीलदार, तळा, जि. रायगड) यांचेकडे सभासद मृत्यूफंड योजनेअंतर्गत सानुग्रह रकमेचा रु. एक लाख  धनादेश संस्थेचे चेअरमन श्री अजय अविनाश कापसे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला...

 याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री संतोष परशुराम यादव, सचिव श्री सचिन महादेव मुसळे व कर्मचारी वृंद उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post