महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक चे जुने बसस्थानक होणार इतिहासात जमा

 


करोडो रुपयांच्या निधीतून बनणार भव्य सुसज्ज बसस्थानकाची वास्तू

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक-: गेल्या कित्येक वर्षानंतर रामटेक बसस्थानकाचे नुतनीकरण होणार आहे... राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नामुळे जुने बसस्थानक आता पाडण्यात आले असुन जवळपास १५ कोटींच्या निधीमधुन एक भव्य व सुशोभीत बसस्थानक रामटेक ला लाभाणार आहे. त्याची सुरुवातही झाली आहे... आता लवकरच प्रवाशांना नविन भव्य व सुसज्ज बसस्थानकाचा लाभ मिळणार आहे...

तसे पहाले तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रामटेक बसस्थानकाची अवस्था लगतच्या तालुक्यातील बसस्थानकापेक्षा बरीच होती... पण तरीसुद्धा बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे लोकांनी स्वागत केले असुन त्याबद्दल ना. जयस्वालांचे लोकांकडून कौतुक तथा आभार व्यक्त केल्या जात आहे... त्याचप्रमाणे रामटेक आगारातील भंगार बसेस तथा बसेसची अपुरी संख्या याकडेही मंत्रीमहोदयांनी लक्ष देण्याची मागणी जनसामांन्यात आहे. कारण रामटेक आगारातील बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे... आणखी कमीतकमी दहा बसेसची नितांत गरज असल्याचे बोलल्या जात आहे... उपलब्ध बसेसमधुनच लोकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण सुरु आहे... तेव्हा प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागपुर बसस्थानकावरही रामटेकसाठीची बस लवकर लागत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पहावयास मिळतो... बस फलाटावर लागताच लोकांचे जत्थे बस च्या दरवाज्याकडे धावत भयंकर परिस्थिती रामटेक बसस्थानकावर पहावयास मिळते... त्याचप्रमाणे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांची रामटेक बसस्थानकावर जणु जत्राच भरत असते... त्यांच्या गर्दीपुढे दोन-तिन बसेस सुद्धा कमी पडतात... यादरम्यान वयोवृद्ध लोकांच्या डोक्यात बसण्यासाठी जागा तर सोडा उभे राहुन प्रवास करण्याचा विचार सुद्धा येत नसावा हे येथील वास्तव परिस्थिती आहे... रामटेकला आता स्वतः मंत्रीमहोदय असल्याने त्यांनी त्यांच्या पुढाकाराने दहा बसेस वाढवुन दिल्या असत्या तर लोकांकडुन मंत्री महोदयांचे मोठे कौतुक केल्या गेले असते यात तिळमात्रही शंका नाही...

Post a Comment

Previous Post Next Post