महाराष्ट्र वेदभुमी

बोगस कृषी उपसंचालकाचा 'कारनामा' उघड



खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे बलकावली नोकरी 

न्यायदेवताच्या दणका, ‘कचारी’ ऐवजी अनु. जमातील ‘कोळी महादेव’ करणे भोवले 

अमितला मिळणारं आता कृषी उपसंचालक वर्ग-१ पद

रामटेक: अत्यंत संर्घशातून जेमतेम परिस्थितीत आश्रम शाळेत, शासकीय आदिवासी वस्तीगृहात राहुन शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमित तुमडाम या आदिवासी तरूणाने ऋशिकेष बोधवड विरूध्दची न्यायिक लढाई जिंकली आहे. महाराश्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कृषी उपसंचालक वर्ग-१ च्या पदासाठी बोधवडची निवड पहिल्या क्रमांकासाठी झाली होती... या पदासाठी एकच जागा राखीव असल्याने त्या यादीत गुणवत्ता क्रमात दुसरा असलेला अमित तुमराम याने बोधवडच्या निवडीवर हरकत घेत त्याचा अनुसूचित जमातीचा ‘कोळी महादेव’ जमातीचा दावा संषयास्पद असल्याने त्याची फेरतपासणी करावी अषी मागणी औरंगाबाद जात प्रमाणपत्र तपासणी समितीकडे केली. औरंगाबाद समितीने यापूर्वीच ऋशीकेष बोधवडच्या कुटूंबातील रक्तसंबंधात यापूर्वीचे त्यांना कोळी महादेव जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र दिल्याची बाब समोर आली... सध्या हिंगोली येथे कार्यरत असलेले निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड आणि आदिवासी विकास विभागामार्फत राबवलेल्या ‘मिशन शौर्य’ योजनेचा लाभ घेतलेला सूग्रिव मंदे याच्या जातीच्या दाव्यावर आँर्गनायझेषन फाॅर राईटस् आॅफ ट्रायबल (आफ्रोट) संघटनेच्या वतीने यापूर्वीच तक्रार करण्यात आली होती... व सूग्रिव मंदेचा कोळी महादेव दावा जात प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध घोशित केला होता... त्यामुळे या प्रकरणाबाबत संघटनेचे अध्यक्ष अँड राजेंद्र मरसकोल्हे यांना पूर्व कल्पना होती. अमित तुमडाम यांनी बोधवड प्रकरणात लक्ष घालण्याची अँड.मरसकोल्हे यांना केली. अनुसचित जमातीच्या राखीव संवर्गातून जातचोर बोगस आदिवासींच्या नियमित सेवा समाप्त करून त्यांना ११ महिण्याच्या करार तत्वावर अधिसंख्य पदावर काम करायला लावणारे अशी त्यांची राज्यात आणि राज्याबाहेर ओळख आहे... आरक्षणावर अँड. मरसकोल्हे यांचे काम आणि नाव असल्याने अमितने त्यांची भेट घेतली. बोधवड प्रकरणास योग्य वळण देण्यासाठी अमितला अँड राजेंद्र मरसकोल्हे यांची मदत झाली... अमितने बोधवडची नियुक्ती आधी मॅट व नंतर उच्च न्यायालयात आव्हानीत केली. दरम्यानच्या काळात औरगाबाद समितीने बोधवडचा ‘कोळी महादेव’ जमातीचा दावा पुराव्यांच्या आधारे अवैध ठरविला...त्या समितीच्या आदेषाला बोधवडने औरगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि हे प्रकरण २०२३ पासून न्यायालयात प्रलंबित होते. या प्रकरणात दिनांक २५ आणि २६ मार्च २०२५ रोजी युक्तीवाद दोन्ही पक्षाकडून करण्यात आला. न्यायालयापुढे जात पडताळणी समितीच्या वतीने अॅड शिंदे, श्रीनिवास सोळंके आणि अमित तुमडामच्या वतीने वरीष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे, यांनी युक्तीवाद केला त्यांना न्यायालयापुढे आलेल्या धक्कादायक पुरावे व पूर्वी बोधवड कुटूंबात रक्तसंबंधात दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा घोळ यावर न्यायालयाला निर्णय घ्यायचा होता, बोधवडच्या वतीने अँड. रामकृश्ण मेंदाडकर यांनी बाजू मांडली मात्र त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला नाही. व बोधवडची याचिका रद् करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अभिमन्यू बोधवडचे निवासी उपजिल्हाधिकारी पद धोक्यात आले असून शिक्षणासाठी बोधवड कुटूंबात आणि त्यांच्या रक्तसंबंधात ज्यांना यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्यांच्या अडचणी पून्हा वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाने बोधवडची याचिका रदद् करून जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे अमित तुमडाम यांचा कृषी उपसंचालक वर्ग-१ पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 बोधवड कुटूंब अडचनीत....

बोधवड प्रकरणात अभिमन्यू बोधवड याने शासकीय पदाचा दुरूपयोग करून खोटया दस्तऐवजाचा जाणीवपूर्वक वापर करून स्वतः कयदयाचा गैरवापर करून शासनाची दिशााभूल केेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून असे जारी केलेले प्रमाणपत्र तात्काळ जप्तीची कारवाई शासनस्तरावरून व्हावी आणि संबधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अँड राजेंद्र मरसकोल्हे, अध्यक्ष आफ्रोट संघटनेची मागणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post