महाराष्ट्र वेदभुमी

एस.बी.आय.कॅप्स आणि रिदय फाउंडेशन्सतर्फे कोलाड विभागात ७ शाळांना मदत; ५५० कुटुंबांना सोलर लाईट व भांड्यांच्या सेटचे वाटप


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर)

    न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी येथे आयोजित कार्यक्रमात एस.बी.आय. कॅप्स चे एम. डी आणि सी.इ.ओ. श्री. वीरेंद्र बन्सल सर व प्रेसिडेंट आणि सी.ओ.ओ. श्री. शेष वर्मा सर यांच्या हस्ते विद्यालयाला बेंच, कपाट तसेच खुर्च्या असे सामान देण्यात आले... रिदय फाउंडेशन्सच्या प्रोजेक्ट "समग्र" अंतर्गत एस.बी.आय. कॅप्स च्या सी. एस. आर. विभागा मार्फत हे सामान देण्यात आले. एकूण सात शाळांना सात कपाट, ७० बेंच, ५० खुर्च्या व दोन पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या... याव्यतिरिक्त ५५० कुटुंबांना सौर ऊर्जेवर चालणारे दिवे व घरगुती जेवणाची भांडी वाटप करण्यात येणार आहेत... त्याची सुरुवात आज विठ्ठलवाडी येथील कार्यक्रमात एस. बी. आय. कॅप्स आणि रिदय फाउंडेशन्स च्या टीमच्या मार्फत करण्यात आली...

यावेळी रिदय फाउंडेशन्सचे संस्थापक श्री. गणेश नायक सर व धीरजा मॅडम उपस्थित होत्या... तसेच  नवजीवन शिक्षण संस्था खांब चे अध्यक्ष तथा गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र शेठ पोटफोडे, ग्रामपंचायत चिंचवली तर्फे अतोणेचे उपसरपंच संजय मोते,जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मरवडे मॅडम, तसेच सात शाळेचे शिक्षक तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... यावेळी मान्यवरांनी सर्वांना संबोधित केले व या ग्रामीण विभागातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन केले...

Post a Comment

Previous Post Next Post