कोलाड (श्याम लोखंडे) :रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील मौज चिल्हे येथील प्रवचनकार, कीर्तनकार हभप नारायण महाराज पांडूरंग महाडिक यांचे वयाच्या 63व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.. त्यांच्या निधनाने महाडिक परिवारावर तसेच चिल्हे गावावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे...
कै.हभप नारायण महाडिक यांनी वडिलांच्या पश्चात साऱ्या कुंटुंबाची जबादारी खांद्यावर घेऊन संसाराचा गाडा हाकत आई, मोठा भाऊ यांच्या बरोबर शेती बरोबर नोकरी व्यवसाय सांभाळत वारकरी संप्रदायाची कास धरत वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून आळंदी पंढपूर नित्यनेम वारी करणारे तसेच सारे कुटुंब वारकरी सांप्रदायिक पाईक हिंदायी बिर्ला ग्रुप तळोजा येथील कारखान्यात उत्तम सेवा करत ते वयोमर्यादानुसार सेवा निवृत्त झाले. घरातील कुटुंबातील भाऊ बहिण यांचे कुटुंब उभा करण्यात मोठा खारीचा वाटा हभप एकनाथ बाबा चव्हाण नाशिक यांचा अनुग्रह घेत वारकरी संप्रदायाचे पाईक झाले विश्व हिंदू वारकरी संप्रदाय कळंबोली पनवेल येथील संगीत भजनात तल्लीन होत उत्तम मृदुंग मनी, हनिमोनियम वादक, गायन कीर्तन प्रवचन भजनाची आवड शांत स्वभाव आणि सर्वांच्या परोपकारी पडणारे नाच गाण्यांचा छंद होता असे नारायण महाराज महाडिक यांचे अचानक जाण्याने संप्रदायी मंडळीत पोकळी निर्माण झाली आहे...
त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, दोन मुली, आई, भाऊ, बहीण पुतणे, जावई, भावजय,भाचे असा मोठा महाडिक परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवारी २८ मार्च आणि उत्तर कार्य तेरावे सोमवारी ३१ मार्च रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे नामवंत कीर्तनकार हभप विवेकानंद शिरसाट महाराज कळंबोली पनवेल यांच्या कीर्तनरुपी सेवेतून पुष्पांजली अर्पण करून संपन्न होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे...