माणगाव:-(नरेश पाटील): शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळखले जाणारे माणगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी यांचे अनोखे दर्शन... पंचायतीमार्फत तोडण्यात आलेले महिलेचे शौचालय पुन्हा बांधून देणार..
याबाबत अधीक माहिती अशी की वॉर्ड क्र.16 खांदाड नगर पं.कडून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेला नाल्याचे काम एका तीन मजलीजवळ कातळजमीन लागल्याने तसेच सेप्टीक टाकीमुळे अर्धवाट बांधून ठेवले गेले होते. परिणामी नाल्याला ले आऊटच नसल्याने तसेच सेप्टीक टाकी फुटल्याने. त्यातून ओव्हरफ्लो सांडपाणी नाल्यात वाहत राहिले.. त्याचबरोबर काहीनी या पावसाचा नाल्यात मोरीचे पाणी सोडल्याने ते पाणी तुंबून राहिले... तर सर्व सोडलेला सांड पाणी तसेच मोरीची पाणी या खोदलेल्या खोल नाल्यात थांबून राहिले त्यामुळे परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली.. तसेच काहीवेळ येथील तीन मजली इमारतीचे ओव्हरफलो पाणी चक्क रस्तायवरही वाहू लागल्याने आखेर येतील रहिवासी यांनी या दोन्ही मुद्द्यांबाबत न. पंचायतकडे लेखी तक्रार अर्ज नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांचे मार्गदर्शन घेऊन सुपूर्द केले होते.. अर्जाचे दखल घेत नगर पं. चे मुख्याधिकारी संतोष माळी व अभियंता या ठिकाणी मंगळवारी. 11 मार्चला सायंकाळी भेट घेऊन अर्धवट बांधलेल्या नाल्याचे बांधकाम, फुटलेला सेप्टीक टाकी, तीन मजलीची ओव्हरफ्लो समस्या, भर उन्हाळा काळात नाला तुंबून राहिलेली परिस्थिती, परिसरात पसरत असलेला सांड पाणी तसेच तीव्र दुर्गंधी, मच्छरचे साम्राज्य याची नोंद घेऊन न. पंचायत याबाबत लवकरात ले आऊट बांधून तसेच ज्यांनी ज्यांनी सांडपाणी, मोरीचे पाणी यात सोडले त्यांना तात्काळ नोटीस देऊन कार्यवाही होण्यासाठी अभियंताला सूचना दिल्या...
दरम्यान या समस्याला झुंजत असलेल्या महिलेने माळी यांना निदर्शनास आणुन दिले नाल्या चा काम नगर पंचायत मार्फत झाले ...मात्र या कामात जेसीबीद्वारे आमचे शौचालय तोडणयात आले..हे कसे काय ? माझ्या मोरीचे पाणी जायला दुसरा पर्याय नाशल्यामुळे मोरीची पाणी या नाल्यात सोडले आहे असे सांगताच मुख्याधिकारी संतोष माळी हे ऐकून गहिरवले आणि थोड्या वेळाने त्या महिलेला दिलासा देत सांगितले न. पंचायतकडून तुम्हाला शौचालय पुन्हा बांधून देऊ. तुम्ही नगर पं. कडे अर्ज सादर करा व शौचालयसाठी असलेला तरतूद रक्कम आपणास दिले जाईल... रस्त्याला लागून शौचालय बांधू नका...आपण घराच्या पाठीमागे बांधा.. असेही संतोष माळी यांनी महिलेस सल्ला दिला. यावरून न. पंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळीचे मानवतावदिचे दुसरे रूप पाहायला मिळाले..
माणगाव नगरीत सर्व अनधिकृत बांधकामचे हटाव मोहीम हाती घेतली त्यावेळी कठोर ऍकशन मोडवर पाहायला मिळालेले माळी इथेमात्र या महिलेला मदतीसाठी मोठा मन दाखवताना दिसून आले...
दरम्यान मगरीचे प्राभल्य भागात पाहाणी करुन अभियंता यांनाही सांगितले की आपण या तलाव सुदृश्य जमीन मालक यांना भेटून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सूचना द्या, तसेच पथदिवेच्या बाबतही असणारी समस्या यावेळी प्रतिनिधीनी याबाबत मुख्याधिकारी यांना सांगितले...

