महाराष्ट्र वेदभुमी

"अलिबाग आमची शान" गाण्याच्या उद्घाटन सोहळा दिमाखदार मैफिलीत संपन्न.

 


अलिबाग (ओमकार नागावकर) : अलिबागची संस्कृती आणि इतिहासाला उजाळा देणारं आपल्या हक्काचं आपल्याचं मातीतील कलाकारांनी गायलेलं अलिबागचं गाणं दि.१५ मार्च रोजी भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग येथे भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आलं... मराठी इंडियन आयडॉल विजेते सागर म्हात्रे, ई-टीवी गौरव महाराष्ट्राचा महाविजेते वैभव थोरवे यांनी सुमधुर आवाजाने श्रोत्यांचे कान मंत्रमुग्ध केले...

    संकल्पना रोहित पाटील, संगीत नवीन मोरे, रोहित नाईक यांनी व्हिडिओ एडिटिंग केलेले "अलिबाग आमची शान" हे गाणं मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आले गाण्यातील सर्व कलाकार अलिबागमधील असून हे गाणं अलिबाग तालुक्याचे मान उंचावणारे असेल व येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडावर राहणारे असेल हे नक्की असे मान्यवराने सांगितले...

      यावेळी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवर रोहित पाटील लिखित गाण्याच्या उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post