महाराष्ट्र वेदभुमी

तब्बल ३७५ विद्यार्थी ठरले बक्षीसाचे मानकरी

 


समर्थ प्राथमिक शाळेत 'बक्षिस २०२५' समारंभाचे आयोजन

कला, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच दिनांक ११ मार्च रोज मंगळवारला कला, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव २०२५ अंतर्गत समर्थ प्राथमिक शाळा रामटेक येथे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... यात तब्बल ३७५ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले...

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री समर्थ शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती कुसुमताई किंमतकर मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर, सहसचिव सारंग किंमतकर, समर्थ कॉन्व्हेंट च्या प्राचार्या श्रीमती घोष मॅडम, पत्रकार पंकज बावनकर, समाजसेवक तथा माजी नगरसेवक सुमित कोठारी सर, पालक सभासद म्हणून आकाश ढोबळे, मिडल स्कूल विभाग प्रमुख सौ विद्याताई किंमतकर मॅडम, समर्थ प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सौ. कविता संदीप जौंजाळ मॅडम, यांचेसह शिक्षक ,शिक्षिका, कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते... कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे तथा संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष स्व. श्री मधुकररावजी किंमतकर यांचे पूजन करून शारदा स्तवन घेण्यात आले... स्वागतगीत व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले... कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता संदीप जौंजाळ मॅडम यांनी केले... प्रास्ताविकेतून त्यांनी वर्षभरातील विविध उपक्रमाचे, कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली, कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या... या कार्यक्रमा अंतर्गत ३७५ मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले... त्यासोबतच महिला दिन सप्ताह निमित्य कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कुसुमताई किंमतकर यांचा प्राथमिक विभागातर्फे सत्कार करण्यात आला व सर्व प्राथमिक विभागातील सर्व महिला शिक्षिकांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला... कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , सौ अनुराधा भुते (खुबाळकर ) मॅडम यांनी केले... कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले... आभार प्रदर्शन कु. अश्विनी पदम मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली..

Post a Comment

Previous Post Next Post