सोगाव येथील प्रसिद्ध चित्रकर्ती चंद्रकला कदम यांच्या नर्सरी
सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व प्रसिद्ध चित्रकर्ती चंद्रकला कदम यांच्या सुप्रभा नर्सरीचे शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले...
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, रोटरी क्लब ऑफ अलिबाग अध्यक्ष व कृषी अधिकारी श्री. भड, पेण येथील नर्सरी तज्ज्ञ तुळशीराम गायकवाड, अलिबाग येथील अंकुर नर्सरीचे संचालक उध्दव पाटील, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, नागाव येथील निलय रिसॉर्टचे संचालक मोहनराव सामंत, मापगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच समद कूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, हेमंत नेमन, माजी सदस्य लाईक कप्तान, मजीद कुर, बाबू कुर, इस्माईल कुर व इतर मान्यवर तसेच सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : सोगाव येथील सुप्रभा नर्सरीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपस्थित मान्यवर,

