महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्ग जन आंदोलन..! मुंबईच्या चाकरमान्यांचा शिमगा साजरा होणार

श्रीवर्धन प्रतिनिधी : माणगाव संपर्कप्रमुख राठोड यांच्या परिपत्रकाच्या सूचनेप्रमाणे व आदेशाप्रमाणे १३ मार्च २०२५ रोजी मुंबई गोवा हायवे या रोडच्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे कोकणवासीय प्रवाशांचे होणारे अतोनात हाल या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता जनआक्रोश समितीने आंदोलन पुकारले आहे.. त्या अनुषंगाने संपर्कप्रमुख राठोड यांनी परिपत्रकाद्वारे दिलेला आदेश याप्रमाणे  १३मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता माणगाव एसटी स्टँड येथे आंदोलनाकरिता उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले...

याची नोंद घेऊन युवा प्रतिष्ठान रायगडतर्फे रायगड जिल्ह्यातील मुंबईत राहणारे तरुण वर्ग व तरुण मंडळ यांच्या कडून आपण रायगडचे चाकरणी आहोत...त्या कारणाने काही वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडल्या कारणाने रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख समाजसेवक श्री नागेंद्र राठोड यांना दिनांक रविवार ९ मार्च २०२५ रोजी निवेदन देत युवा प्रतिष्ठान रायगडतर्फे रायगड जिल्ह्यातील मुंबईत राहणारे तरुण वर्ग व तरुण मंडळाचे सदस्य व प्रतिष्ठानचे व युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक संघटना सर्व पदाधिकारी व सामाजिक सहकारी सर्वांच्या वतीन जाहीर पाठीबा देण्यात आलाय...

Post a Comment

Previous Post Next Post