मुरुड प्रतिनिधी: मयूर पालवणकर
रायगडः डोंगरीकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली...अलिबाग मुरुड तालुक्याच्यावतीने आमदारांचा शिवसैनिकांसोबत संवाद, आभार सभा व आढावा बैठक याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.... मुरुडचे तालुका प्रमुख ऋषीकांत डोंगरीकर यांनी याबाबतचे नियोजन केले होते, मात्र यामध्ये त्यांनी जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यासह महिला जिल्हा प्रमुख, युवा जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुखांना डावलल्याने राजा केणी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे... तसेच पुढील आदेश येईपर्यंत मुरुड शिवसेना तालुका प्रमुख पदाला स्थगिती दिली आहे...
