"नारायण टेकडी" आता "श्री दत्त टेकडी" म्हणून ओळख
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: नारायण टेकड़ी येथे सद्गुरू दरबारात प्रगट दिन १९ फेब्रुवारी ला मोठ्या हर्षोल्हासाने मनविण्यात आला. १८ फेब्रुवारीला सकाळी ९.०० वाजता दिप प्रज्वलनाने तसेच " ओम नमो नारायणाय " या अष्टाक्षरी महामंत्राच्या अखंड जपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तसेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सद्गुरू नारायणस्वामी संजीवन समाधीचा महाभिषेक झाल्यावर अखंड जपाचे समापन होते... त्यानंतर श्री दत्तगुरु छोटूबाबा समाधी मंडपात, श्री दत्तगुरूंची आरती व जयघोष झाल्यावर प्रगट दिनाचे पर्वावर श्री दत्तगुरूंचे मौलिक विचार ताई महाराज आपल्या प्रासादिक वाणीने भक्त भावीकांसमोर प्रगट केले.ताई महाराजांच्या श्री दत्तगुरुंच्या प्रचार प्रसारामुळे ही " नारायण टेकडी " आता " श्री दत्त टेकडी " म्हणून ओळखल्या जाते... हजारोंच्या संख्येने भक्त भाविक निरनिराळ्या प्रांतातून, संपूर्ण भारतातून येथे दर्शनासाठी येतात.शिस्तबध्द पध्दतीने रांगेमध्ये उभे राहून सर्वजण सद्गुरु नारायणस्वामी संजीवनी समाधीचे तसेच श्री दत्तगुरु बालयोगी छोटूबाबा समाधीचे दर्शन घेतात... त्यानंतर ताईमहाराज यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यानंतर भव्य अशा प्रसाद भवनाकडे भक्तगण जातात... तेथे शांती पाठ केल्यावर सर्वजण आनंदाने महाप्रसादाचे सेवन करतात... दोन्ही समाधी स्थानी समाधीला माथा टेकवून, स्पर्श करून शांततेने दर्शन करण्याचे खरे सात्विक समाधान येथे मिळते... हे अतिशय जागृत स्थान आहे... समाधी स्थानी मौन दर्शनाने चित्ताची एकाग्रता साधते... त्याचबरोबर खऱ्या शांतीचा येथे अनुभव मिळतो असे भक्त गण म्हणतात...
