महाराष्ट्र वेदभुमी

चिंचवलीतर्फे अतोणे,कांदळे,बेलवाडी रस्त्याची दयनीय अवस्था,रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?

विद्यार्थ्यांसहीत नागरिकांच्या जिवाला धोका

कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील डोंगर आदिवासी चिंचवली तर्फे अतोणे ते कांदळे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असुन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? यामुळे या मार्गानी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसहित नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे...

अतिशय दुर्गम भागातील चिंचवली तर्फे अतोणे ते कांदळे,बेलवाडी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असुन या मार्गाने विठ्ठलवाडी हायस्कूल येथे जाणारे कांदळे,बेलवाडी येथील असंख्य विद्यार्थी तसेच कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक या मार्गाने प्रवास करीत आहेत...हा रस्त्याला असणारी वेडीवाकडी अवघड वळणे,रस्त्याच्या आजूबाजूला झाडांझुडपे यामुळे येणारी जाणारी वाहने दिसत नाही... शिवाय अरुंद असणारा रस्ता यामुळे वाहन चालवतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे...

या रस्त्याच्या कामाची जाहिरात सप्टेंबर २०२२ रोजी देण्यात आली होती व या रस्त्याचे काम सिद्धिविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदाराने ठेका मिळवला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे...या रस्त्याच्या कामाला मंजुरी होऊन दोन वर्षापेक्षा जास्त दिवस होऊन गेले तरी अद्याप ही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही.. मग या निकृष्ट  दर्जाच्या  रस्त्यामुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्या नंतर या रस्त्याचे काम केले जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया या मार्गानी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post