पहिल्याच सफारीत पाच वार्धाच्या दर्शनाने झाला गदगद
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- आतापर्यत जंगलही पाहिला नाही जंगलात कधी गेलो पण नाही परंतू पेंचचे फक्त नावच ऐकले होते परंतू प्रत्यक्षात आज पेंचला भेट दिली व पहिल्याच सफारीत मला वाघीन सह चार बछड्यांचे दर्शन झाले हे माझे नशीबच या वाघांच्या दर्शनाने धन्य झालो अशी माहिती जंगल सफारीवरुन परत आल्यावर टी २० चा भारतीय खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी दिली...
क्रिकेटच्या खेळपट्टीवरचा ३६० डिग्री फलंदाज म्हणून ओळख असलेला आणि भल्याभल्या गोलंदाजांना बेदम हाणणारा भारतीय क्रिकेट विश्वातला लखलखता तारा आणि भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापारच्या जंगलात उतरला होता. त्याच्या पहिल्याच जंगल सफारीत त्याला एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच वाघांचे दर्शन झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
शुक्रवारी दुपारच्या सफारीत सुर्यकुमार यादव यांनी खुर्सापार येथे जंगल सफारी केली... सुर्यकुमार यादवच्या या सफारीची पूर्णता गोपनियता ठेवण्यात आली होती. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाने खुर्सापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ईलमकर यांना माहिती मिळाली तर पोलीस यंत्रणेकडून देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांना माहिती होती...
सुर्यकुमार यादव यांना जंगलाबद्दल इलमकर यांनी माहिती दिली... तर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सुर्यकुमारने माहिती ऐकून घेतली.सुर्यकुमारने शुध्द मराठीत वनविभाग व पोलीसा़शी संवाद साधतांना त्यांनी मी कधीही जंगलात सुध्दा गेलो नाही...परंतू खुर्सापार येथे जंगल सफारीचा आनंद घेतला त्यात आईसह चार बछड्यांचे दर्शन झाले... मी कधी विचारही केला नव्हता कि, जंगलात वाघांचे अशाप्रकाने दर्शन होतात त्यामुळे मी फारच धन्य झाले... यावेळी खुर्सापारचे वमपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत इलमकर यांनी पेंचची कॉफी टेबल बुक सुर्यकुमारला दिली. यावेळी देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे स्टॉफसह उपस्थित होते...
सुर्यकुमार यादव यांनी पेंचच्या खिर्सापार येथे भेट दिली. त्यांना टी १४ वाघीन व चार बछड्यांचे दर्शन झाल्याने ते खुश झालेत... त्यांना जंगलाची माहिती देण्यात आली. त्यांनी पण उपस्थीतांशी मनसोक्त संवाद साधला. येथे येणारा प्रत्येक पर्यटन व्याघ्र दर्शनाने समाधानी होवून जावो हाच आमचा प्रयत्न राहील.- अभीजीत इलमकर वनपरीक्षेत्र अधिकारी,खुर्सापार
मराठी माणूस
दूरचित्रवाणीवर कायमच हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलताना दिसणारा सूर्यकुमार 'मराठी माणूस' असल्याचा विसर आपणा साऱ्यांनाच पडला असतो...मात्र, या भेटीत त्याने वन विभाग व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अस्खलित मराठीतच संवाद साधला. त्यामुळे, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान झळकत होते...
