भांडुप (पंकजकुमार पाटील): राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मिडियम स्कूल येथे नुकताच मातृपितृ दिन पूजन साजरा करण्यात आला...
भांडुप पश्चिम येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्तपणे विद्यार्थांमध्ये आपल्या आई-वडिलांबद्दल आदर, प्रेम वाढवण्याच्या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी माता पिता पूजन दिन साजरा केला...
अत्याधुनिक युगात वावरताना आपल्या अवतीभोवती मोबाईलच्या दुनियेत जगताना विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आई वडिलां बद्दलचा सन्मान ,आदर याची कुठेतरी दिवसेंदिवस कमतरता होत चालली आहे... खरं तर परमेश्वराची भक्ती व सेवा सर्व ठिकाणी ऐकतो बोलतो पण माता-पितांचे पूजन करणे व त्यांचा आदर , त्यांच्याबद्दलचे प्रेम मनात जपून ते वाढवणे हीच ईश्वर सेवा असते...हे विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यासाठी शाळेने हा उपक्रम सुरू केला आहे..
विशेष म्हणजे सर्वच पालक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होते...या अनोख्या माता पिता पूजन उपक्रमाची सर्व समाजातील लोकांकडून कौतुक करण्यात आले...
