कोलाड (श्याम लोखंडे): हर घर जल केंद्र सरकारची योजना गेली पाच सहा वर्षापासून विविध स्तरांवर तसेच गावागावात राबवली जात आहे मात्र तरी देखील पिण्याच्या पाण्याची बोंब वाढलेली दिसत असून याबाबत गावातील महिलांनी चक्क पाण्यासाठी युवा नेते तथा माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्याकडे मांडली व्यथा याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे...
रोहा तालुक्यातील दिवाळी तर्फे तळवली येथील महिलांची पिण्याच्या पाण्याची बोंब वाढत असल्याने गावातील सर्व महिलांनी याबाबत युवा नेते माजी आमदार अनिकेतभाई तटकरे हे मुंबई गोवा महामार्गाचे कोलाड इंदापूर दरम्यानच्या रखडलेल्या कामांची पाहणी मौजे तिसे तळवली येथे करत असताना गावातील महिलांनी एकत्रित येत त्यांची भेट घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या व्यथा मांडल्या गावातील जल जीवन मिशन नळ पाणी योजनेचे काम जलद गतीने सुरू आहे...जुनी असणाऱ्या योजनेतून पुरवठा होत असलेल्या तलाव विहिरीची पाण्याची पातळी खाली गेली आहे...त्यात कोलाड कुंडलिका सिंचनातून माणगावकडे वाहणारा कालवा अनेक दिवसांपासुन त्याची दुरूस्ती सुरू असल्याने त्याला देखील पाणी सोडले नाही त्यामूळे पाणी टंचाईला अधिक सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थ महिलांनी प्रसंगी सांगितले...
गावातील महिलांना होत असलेला अपुरा पाणी पुरवठा आणि टंचाईची तसेच न सोडले गेलेले कालव्याचे पाणी आणि जमा झालेला घनकचरा ही समस्या महिलांनी कार्यतत्पर कर्तव्यदक्ष युवा नेते माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या समोर मांडली असता त्यावर तत्काळ अनिकेतभाई तटकरे यांनी कोलाड येथील जलसंपदा खाते अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माणगावकडे वाहणारा कालव्याच्या पाणी प्रश्नाबाबत विचारणा करत यावर लवकरात लवकर उपाय योजना करून पाणी सोडण्याचे सांगत याही गोष्टींचे व समस्येचे या प्रसंगी निवारण केले...तर यावर कालवा अधिकारी अथवा जलसंपदा खात्याकडून याचा कितपत विचार करण्यात येईल यावर सारे अवलंबून आहे...
प्रतिक्रया
गावातील जल जीवन मिशन नळ पाणी योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असून ते काम लवकरच पूर्ण होईल तसेच जुनी असलेली भारत निर्माणची नळ पाणी पुरवठा योजना हिला वीस वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी ती सुरू आहे मात्र त्यातून पुरवठा होणाऱ्या विहिरीतील आणि तलावातील पाण्याची पातळी त्यातील साठा कमी होत अत्यंत खाली गेली असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तसेच डोळवहाल सिंचनातून माणगावकडे वाहनाऱ्या कालव्याला अद्याप पाणी सोडले नाही त्याची दुरूस्ती आणि साफसफाईचे काम सुरू आहे कालव्याला जरी पाणी सोडले तरी महिलांची धुणी भांडी कपडे धुण्याची समस्या दूर होईल.तसेच नव्या नळ पाणी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित खाते तसेच ठेकेदार यांच्याकडून अथक प्रयत्न सुरू आहेत.....जयेश घावटे उपसरपंच तळवली...
