कोमसाप उरणकडून अभिनंदन ! - :अध्यक्ष, मच्छिंद्र म्हात्रे
नवी मुंबई ११ फेब्रुवारी अजय शिवकर : यशवंतराव चव्हाण केंद्र,नवी मुंबई यांनी साहित्य सेवा आणि सामाजिक प्रबोधन यासाठी ठेवलेला " कृतज्ञता पुरस्कार " २०२५ हा रायगडभूषण प्रा.एल बी.पाटील यांना केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी नुकताच जाहीर केलाय...त्यामुळे त्यांचे कोकण मराठी साहित्य परिषद उरण, जाहीर अभिनंदन करीत असल्याचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी आमच्या प्रतिनिधीना कळविले आहे...
रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील हे एक साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील चळवळखोर व्यक्तिमत्त्व आहे... ३५ पूस्तके प्रकाशित केली असून स्वरचित २३ नाटके राज्य स्पर्धेत सादर करून अनेक पारितोषिके लेखन, सादरीकरण आणि कलाकारांना प्राप्त करून दिली आहेत...
सामाजिक कार्यात,
१) पतीच़्या मृत्यूनंतर पत्नीचे सौभाग्यालंकार उतरवू नयेत...
२) आगरी समाजातील दारू मटणाची मांडवप्रथा बंद करा ...
३) उरणात १९९८ मध्ये सुरू होण्यावेळीच लेडिजबार बंद करण्यात प्रमुख होते..
४) २००५ सेझ विरोधात २३गावांमध्ये कविसंमेलनातून त्यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती केली...
५) उरणात दर महिन्याच्या १७ तारखेला आजवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मधुबन कट्टा कोमसापने ११२ ज्येष्ठांसाठी कविसंमेलने घेतली आहेत...
त्यांची साहित्य आणि सामाजिक सेवा ही नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा सन्मान आहे,असे आमच्या कोमसापला वाटते,असेही अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे म्हणाले...
हा सन्मान २२/०२/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता स्टर्लिंग कालेज नेरूळ येथे मा.मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते केला जाणार आहे.याचवेळी ३ संस्था आणि १३ व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे...
