महाराष्ट्र वेदभुमी

कुणबी समाज नेते माजी आ स्व.पा.रा.सानप यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.


कोलाड (श्याम लोखंडे) कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा.सानप यांची तिसावे पुण्यस्मरण सोहळा त्यांच्या मूळ गावी संभे येथे त्यांच्या कुटुंबियांच्या व संभे ग्रामस्थांच्या वतीने राजिप शाळा संभे येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत व मागदर्शन करत मोठया उत्साहात कऱण्यात आले...

कुणबी समाज नेते व माजी आमदार स्व. पा रा सानप यांच्या पुण्यस्मरण सोहळा प्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव दिवाण सानप आणि कुटुंबाच्या तसेच संभे ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक शाळा संभे येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी दिवाण सानप, युवा कार्यकर्ते व संभे ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच संजय सानप, हभप नारायण महाराज दहिंबेकर, पत्रकार डॉ श्याम लोखंडे,पोलीस पाटील अनंत सानप, पांडूरंग सानप, विलास दहिंबेकर, होनाजी सानप, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रिया पवार, रेश्मा जमादार सह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, संभे ग्रामस्थ आदी शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते...

यावेळी युवा कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच संजय सानप यांनी समाज नेते तथा या गावचे सुपुत्र माजी आमदार स्व. पा रा सानप यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थी वर्गाला पटवून दिली तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले...

Post a Comment

Previous Post Next Post