महाराष्ट्र वेदभुमी

"HMPV नवा विषाणू",घाबरू नका सतर्क राहा !- जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- संपूर्ण जग कोरोना महामारीतून सावरले असतानाच आता पुन्हा चीनमध्ये नव्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरलचा (HMPV) कहर झाला आणि आता तो भारतात येऊन पोहोचला आहे...

सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने (HMPV) थैमान घातलेला आहे... नागपुरात अद्यापही ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’च्या (एचएमपीव्ही) रुग्णाची नोंद झाली नाही. जे दोन रुग्ण आढळून आले ते संशयित आहेत. त्यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) व पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत...

नागपूर येथे प्रसारमाध्यमांवर ‘एचएमपीव्ही’चे दोन रुग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने उपराजाधनीत खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी याला खोडून काढत ते रुग्ण संशयीत असल्याचे सांगितले... डॉ. इटनकर म्हणाले, संशयित रुग्णांमध्ये १४ वर्षांची मुलगी व ७ वर्षांचा मुलगा आहे... त्यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने एका खासगी रुग्णालयातच त्यांची तपासणी करण्यात आली.. त्यात ‘एचएमपीव्ही’ पॉझिटीव्ह आले... मात्र, शासकीय प्रयोगशाळेतून त्याची पुष्टी होणे गरजेचे आहे. म्हणून ‘एम्स’ व पुण्याच्या प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात आले आहेत... दोघांमध्येही सामान्य लक्षणे दिसत होती... कोणतेही गंभीर लक्षणे दिसत नसल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही... योग्य औषधधोपचारानंतर घरी पाठवण्यात आले... दोन्ही लहान मुले आजारातून बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे... 

“एचएमपीव्ही विषाणू संदर्भात सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण नाही... जनतेच्या मनात भीती पसरवू नकात. सोशल मीडियावर चुकीची माहिती कोणीही पसरवू नये. नागरिकांनी घाबरून न जाता जी काळजी आपण इतर साथीच्या आजारात घेतो तीच काळजी घ्या.”-  जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर 

Post a Comment

Previous Post Next Post