महाराष्ट्र वेदभुमी

नेचर युथ टीम (विदर्भ ) कडून रोप वाटप


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत वृक्षारोपण ही काळाची गरज आहे... हे ओळखून नेचर युथ टीम (विदर्भ ) कडून सनराईस इंटनॅशनल स्कुलला भेट देत... या उपक्रमामागील प्रेरणा होती, राहुल गोरीकर रा. मनसर यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त नेचर युथ टीमणी २० रोप देत स्कुलमध्ये उपक्रम राबविला... याला चांगला प्रतिसाद मिळत असून निसर्गाचे आपण काहीतरी देणं लागतो...

झाडे म्हणजे पृथ्वीचे श्वास आहेत. त्यांनी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, हवा, आणि औषधी अशा अनेक मूलभूत गरजा पुरवल्या आहेत... मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या आणि औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड ही चिंतेचा विषय आहे... भविष्यात ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे...

नेचर युथ टीमच्या या प्रयत्नामुळे पर्यावरण रक्षणाची प्रेरणा मिळते... सनराईस शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले...नेचर युथ टीमचा हा उपक्रम ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाला अधिक बळ देतो...वाढत्या प्रदूषणाच्या काळात झाडांची लागवड ही काळाची गरज आहे. नेचर युथ टीमचे हे योगदान समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल...

Post a Comment

Previous Post Next Post