सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- जयसेवा आदर्श हायस्कूल, पवनी येथे दि. २४ जानेवारी रोज शुक्रवारला वार्षिकोत्सव -स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. उदघाटन श्री. डॉ. मिलिंद माने (माजी आमदार -उत्तर नागपूर )यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री. डॉ. राजीव मोहता (किशोरवयीन व बालरोग तज्ज्ञ, नागपूर )उपस्थित होते...
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव श्री. डॉ. नरेंद्र कोडवते हे उपस्थित होते... संस्थेचे पदाधिकारी म्हणून श्री. शालिकरामजी उईके व श्री. दिलीपजी कुमरे हेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. सरियाम मॅडम यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पवनी नगरीतील नागरिक उपस्थित होते... कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धोटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कळंबे सर यांनी केले...