सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ या विषयावर समाज भवन ग्रामपंचायत कट्टा येथे उपविभागीय अधिकारी, रामटेक यांच्या वतीने ॲट्रॉसिटी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
तहसीलदार पूनम कदम यांनी ॲट्रॉसिटी कायदा अधिनियम १९८९ व २०१६ सुधारित कायदा उपस्थितांना समजावून सांगितला. अनुसूचित जाती जमाती संरक्षक कायदा म्हणून हा कायदा ओळखला जातो सामाजिक सलोखा, जातीभेद निर्मूलन व सामाजिक सुरक्षेसाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे तहसीलदार पूनम कदम यांनी सांगितले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन समतादूत राजेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच महाराष्ट्र गीत वाजविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कट्टा येथील सरपंच वनिता टेकाम होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समतादूत प्रकल्पाचे नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले उपस्थित होते. तसेच मंचावर मंडळ अधिकारी अमोल पोतदार, सचिव मनोज कटारे, उपसरपंच विशाल वरठी, पर्यवेक्षिका दिपा हुमणे, पर्यवेक्षिका प्रेरणा ढोले, न.प.रामटेक चे प्रशासकीय अधिकारी प्रवीण सरगर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी म्हणून देवलापार व कट्टा परिसरातील अंगणवाडी सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यशाळेत उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. मंडळ अधिकारी अमोल पोतदार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार, सुकेशीनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर, प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्पाधिकारी हृदय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले...
