महाराष्ट्र वेदभुमी

शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलात को.म.सा.प.चे कवी संमेलन

आवरे-उरण - (अजय शिवकर) : ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे  शैक्षणिक संकुल - आवरे येथे बुधवार दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी  कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित कवी संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले या कवी संमेलनात विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर कवींनी सहभाग घेतला मराठी साहित्याचा  वारसा  पुढे जोपासला जावा यासाठी  कवींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून  प्रबोधन  केले. कवी संमेलनात  सेवानिवृत्त प्राचार्य ए. डी. पाटील, प्रा. एल. बी. पाटील, श्री. मच्छिंद्र म्हात्रे, श्री. रामचंद्र म्हात्रे, श्री. अजय शिवकर श्री. न.ग. पाटील व श्री. लवेश मोकल इत्यादी मान्यवर कवी उपस्थित होते. प्राचार्य सुभाष ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कवींनी विविध विषयावर तसेच आगरी बोली भाषेत कविता सादर केल्या, यावेळी शाळेतील विद्यार्थीनी माही भोसले, विद्या म्हामणकर, गौरी थळी व निर्जल ठाकूर यांनी स्वरचित कविता सादर केल्या. तसेच शाळेतील  शिक्षक विलास काटे व  निवास गावंड  यांनी आपली कविता सादर केली काव्य संमेलनाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास काटे तर आभार प्रदर्शन रोहिणी गोरे यांनी केले. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  विशेष परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post