महाराष्ट्र वेदभुमी

न्हावे येथे हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

 


प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा: प्रभात महिला ग्रामसंघ न्हावे व ग्रुप ग्रामपंचायत न्हावे यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम रा.जी.प. शाळा न्हावे मराठी येथे मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला... तालुका अभियान व्यवस्थापक अक्षय खंदारे व प्रभात समन्वयक नेहा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच नितीन डबीर , उपसरपंच पांडुरंग कासकर , ग्रामसेवक दिपक चोरघे , सदस्य संध्या पाटील , पांडुरंग न्हावकर , तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल झुरे , सी. आर. पी. अश्विनी डबीर , रजनी पाटील अंगणवाडी सेविका , बचत गटाच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

               या प्रसंगी प्रत्येक महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी ग्रामपंचायत लागणारे सहकार्य करण्यास तयार आहे असे ग्रामसेवक वारघे म्हणाले. शासनाचे प्रत्येक महिलेला लखपती करण्याचे धोरण आहे... त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा किंवा गटाचा व्यवसाय करणे गरजेचे आहे...गटातील एका व्यक्तीने व्यवसायाला सुरुवात केली तर इतर नऊ महिलांनी तिला सहकार्य केले पाहिजे असे नेहा पाटील म्हणाल्या... तर आपल्या बचत गटाची समुहीक मिटिंग मासिक दिलेल्या दिवशी घेण्यात यावे व आपल्या समूहातील प्रत्येक महिला लखपती होईल याकडे लक्ष द्यावे व त्यांना लागणारे प्रशिक्षण हे तालुका अभियान कक्षातर्फे मोफत देण्यात येईल असे तालुका व्यवस्थापक अध्यक्ष खंदारे म्हणाले...

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक दीपक वारघे यांनी तर अश्विनी डबीर यांनी सर्वांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post