महाराष्ट्र वेदभुमी

वाहतुक नियमांचे पालन करा- अरुण बकाल

 

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक : कविकुलगुरू इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये २९ जानेवारीला महामार्ग पोलिस व  उपप्रादेशीक परिवहन अधिकारी नागपूर यांचे तर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन व प्रबोधन कार्यशाळाचे आयोजन केले...

कार्यक्रमाची अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली... यावेळी प्रामुख्याने महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरिक्षक अरुण बकाल, उपप्रादेशीक परिवहन ग्रामिण अधिकारी प्रशांत ताकसंडे, मंगेश बरडे व डीन डॉ. पंकज आष्टनकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते...

महामार्ग चे सहायक पोलिस निरीक्षक अरुण बकाल मार्गदर्शन पर म्हणाले की वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास दुर्घटना टाळला येते. दुचाकी वाहन धारकांनी हेलमेट वापरावे, वाहनाची गती मर्यादित ठेवावी, मोबाइलचा वापर टाळावा... चारचाकी वाहन धारकानी शिटबेल्ट वापरावा... आरटीओ मंगेश बरडे यानी प्रझेंन्टेशनच्या माध्यमातून अपघात टा‌ळण्यासाठी रस्त्याला लागलेले फलक व चिन्ह याच्या द्वारे दिलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करावे... 

प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे म्हणाले की रस्ता सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन मुळे विद्यार्थांमधे जनजागृति होईल... कार्यक्रम यशस्वीतेकरीता एनएसएस कार्यक्रम अधिकारी उद्धल हटवार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी यानी प्रयत्न केले...

Post a Comment

Previous Post Next Post