महाराष्ट्र वेदभुमी

प्रजासत्ताक दिन!पर्यावरण रक्षण, महिला सुरक्षा,रस्ता, सुरक्षा, पथनाट्यातून विद्यार्थ्यानी दिला अनोखा संदेश.


श्याम लोखंडे ( रोहा रायगड ) : रायगड रोहा तालुक्यातील राजिप शाळा गोवे येथील विद्यार्थ्यांनी २६ जानेवारी रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत गोवे येथील प्रांगणात पर्यावरण रक्षण, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा या पथनाट्य सादर करून या पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थांना अनोखा संदेश देऊन सर्वांची मने जिंकली.तसेच देशभक्ती गीताच्या तालावर लेझीम नृत्य विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे सादर केले...


या अगोदर राजिप शाळा गोवे येथे शिक्षक समितीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव तसेच गोवे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी गोविंद शिद यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच सुमित गायकवाड, सदस्य सुप्रिया जाधव, नितीन जाधव,नरेंद्र पवार,रंजिता जाधव, निशा जवके, अंजली पिंपलकर, भावना कापसे, कर्मचारी वृंद, संदीप जाधव, सुरेश जाधव, अंबाजी जाधव, राजेश शिर्के, कमलाकर शिर्के, लहू पिंपलकर, महेंद्र जाधव, भरत जाधव, रामचंद्र कापसे, अरुणा जाधव, शिक्षक जयेश महाडीक, सहशिक्षिका रंजना  गांधारे मॅडम, अंगणवाडी सेविका सुरेखा जाधव,असंख्य ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तरुण वर्ग उपस्थित होते..

यावेळी राजिप गोवे येथील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य, गोवे ग्रामस्थ, महिला बचत गट, आदिवासी वाडी, बौद्ध वाडी सतरंजी सार्वजनिक बेशिन वाटप यांचे वाटप  करण्यात आले.तसेच मुलांना घडविणारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक जयेश महाडीक, रंजना गांधारे, तसेच रायगड आयकॉन उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त रायगड भुषण पत्रकार विश्वास निकम यांचा ही सत्कार करण्यात आला...


Post a Comment

Previous Post Next Post