सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : कविकुलगुरु इंन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड सायंस (किटस) रामटेक मध्ये प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. एनसीसी पथकाने मानवंदना दिली. एनसीसी पथकाचे प्राचार्य यानी निरिक्षण केले . प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी शैक्षणीक वर्षातील झालेल्या विविध् उपक्रमाचा व पुढे होणाऱ्या उपक्रमाचा आढावा घेत ते म्हणाले की किट्सला नैकच्या 'ए' दर्जा मिळाला व किट्स ऑटोनॉमस झाले ही मोठी उपलब्धि आहे. यापुढे ही अश्याच प्रकारचे उपक्रम राबवून किट्स चे नाव मोठे करू. त्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापकांचा क्रिकेट सामना झाला...
या वेळी मोठ्या संख्येत प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमा करीता संस्थेचे सचिव व्ही. श्रीनिवास राव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता डॉ. डीन पंकज आष्टणकर यांचे मार्गदर्शन तसेच एनसीसीचे प्रा. रजत यादव, एनएसएसचे डॉ. उद्धल हटवार, शारिरिक शिक्षण विभागाचे दिनेश जोशी व विद्यार्थां यांनी प्रयत्न केले. श्रावणी चकनीपवार यांनी संचालन व आभार व्यक्त केले...
