श्याम लोखंडे( रोहा रायगड) : रोहा तालुक्यातील खांब विभागातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल खांब येथे देशाचा ७६ वा.प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
देशाचे ७६ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त या शाळेचे ध्वजारोहण कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस नितीन चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी हभप नारायण महाराज लोखंडे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, दिलीप मोहिते,प्रदिप मरवडे, सचिन गोळे, तेजस जाधव, लिलाधर देवकर मुरलीधर सावंत, संतोष महाडिक निलेश शिंदे, महेंद्र वारगुडे, सूर्यकांत पोटफोडे, गणेश कोस्तेकर, सुभाष जाधव, सुनिल तुपकर, प्रकाश कोकाटे, अमित भोईर, सौ. रजना चितलकर, प्रणाली धनावडे, अनुपमा चितलकर, अर्चना परबळकर, दर्शना देवकर, इत्यादी मान्यवर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रिया लोखंडे आदी विद्यार्थी शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थीत होते...
शुक्रवारी २६ जानेवारी रोजी देशाच्या ७६ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून विविध कला सादर करत मराठी हिंदी इंग्रजी भाषेत प्रजाकसत्ताक दिनाबद्दलचे महत्व पटवून दिले तसेच विविध कला सादर केली तर यावेळी , सुधिर लोखंडे, संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे,त्याच बरोबर प्रमूख पाहुणे सहाय्यक पोलिस नितीन चौधरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप मुख्याध्यापिका सौ सुप्रिया पाशिलकर विद्यार्थिनी आर्या चितळकर,यांनी केले तर सांगता आभार प्रदर्शन कु.सेजल शेडगे हिने केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका ऋतुजा पवार, प्रतिक्षा धामणसे, प्रज्ञा माने, स्नेहा मोहिते, रुपाली मरवडे,नीलम दळवी, प्रियंका चिकने, दर्शना धणवी, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर महाडिक आणि मदतनीस श्रुती वाजे यांनी अथक परिश्रम घेतले...