महाराष्ट्र वेदभुमी

हळदीकुंकूच्या माध्यमातून विधवा मैत्रिणींचा सन्मान

उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ): द्रोणागिरी नोड मधील प्रजापती मग्नम  वसाहती मध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... महिलांनी आपले वेळेचे योगदान देऊन सडा, रांगोळी, शृंगार रूपात पारंपारिक वेशात हळदी कुंकू, वाण लुटून त्याच बरोबर संवाद, ओळख, अल्पोहार , क्षणचित्रे, अन्ताक्षरी, रील्स, हास्यकल्लोळ, असा दिमाखदारात समारंभ संपन्न झाला... 

  या हळदीकुंकूचे औचित्य साधून विशेष म्हणजे समाज परिवर्तन म्हणून विधवा मैत्रिणींना सन्मानीत केले गेले.समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे म्हणून विधवा भगिनीचा सत्कार करण्यात आला... विधवा भगिनीं कुठेही त्यांच्या कर्तबगारीत त्या कमी नसतात हा संदेश समाजाला हळदी कुंकू कार्यक्रमातून देण्यात आला. अशा प्रकारे हळदी कुंकू समारंभ विविधतेने संपन्न झाला...

Post a Comment

Previous Post Next Post