महाराष्ट्र वेदभुमी

करोडो रुपयांची वीज चोरी उघडकीस

 


एका वर्षात ४ लक्ष ९० हजार ३२ युनिटची चोरी

१ कोटी २ लक्ष २३ हजार ८९४ रुपयांची चोरी उघडकीस

सचिन चौरसिया प्रतिनीधी

रामटेक :- तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिलवर महावितरणकडून वीज चोरी संदर्भात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी २ लक्ष २३ हजार ८९४ रुपयांची चोरी उघडकीस आली असून ही विदर्भातील आजवरची सर्वात मोठी विज चोरी असल्याचे बोलले जातंय..

रामटेक तालुक्यातील देवलापार येथून चोरीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे... रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल १ कोटी २ लक्ष २३ हजार ८९४ रुपयांची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे...  या कारवाईत तडजोडीच्या रकमेपोटी १३ लक्ष १० हजाराच दंड देखील ठोठविला आहे... संपुर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे... मात्र या चोरीच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे...

महावितरणच्या नागपूर शहर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे हे दुपारी ४.४५ च्या सुमारास त्यांचे सहकारी सहायक अभियंता एन. आर. बागडे, सहयक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी व्ही. एस. बिसने, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. आर. यादव व मुमारी व्हि. के बारलिंगे यांचेसह रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिलचा विजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले असता तेथे विज वापराची नोंद होण्यासाठी असलेल्या थ्री फेजच्या औद्योगिक विज मीटरला महावितरणचे सील नव्हते, सोबतच अतिरिक्त केबल जोडून वीज पुरवठा सुरू होता... या सर्व प्रकाराची योग्य शहानिशा करून ग्राहकाने अवैधरीत्या विज पुरवठा घेत मागील १२ महिन्याच्या कालावधीत ४ लाख ९० हजार ३२ विज युनिटचा अवैध वापर करून तब्बल १ कोटी २ लक्ष २३ हजार ८९४ चे महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे... या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून  याप्रकरणी ताज राईस मिलचे शफ़िक अंसारी यांच्या विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३, सुधारीत २००७ च्या कलम १५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला... पुढील तपास सध्या सुरू आहे...

सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागा अंतर्गत कार्यरत

नागपूर शहर भरारी पथकाने विदर्भातील आजवरची सर्वात मोठि वीज चोरी उघडकीस आणण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सौ. अपर्णा गिते (म.पो.से), नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, सुरक्षा व अंमजबावणी विभागाच्या नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुनिल थापेकर यांच्यासह अनेकांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे आणि त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post