महाराष्ट्र वेदभुमी

शैक्षणिक प्रगतीसाठी ‘शतप्रतिशत’चे उद्दिष्ट- तहसिलदार


शाळेची पटसंख्या व शैक्षणिक प्रगतीसाठी केले व्यवस्थापनाचे कौतुक

सचिन चौरसिया प्रतिनिधी

 रामटेक :- मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे... अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत... 

विविध विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक उपक्रमाची पाहणी केली... विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापनाने केलेल्या उपाययोजना व विद्यार्थी संख्या पाहुन तहसिलदार रमेश कोडापे यांनी यावेळी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले... तहसिलदार रमेश कोडापे यांनी (ता.९) जानेवारीला शाळेला भेट दिली... पुढेही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवुन आणण्याकरीता असेच विविध  उपक्रम राबविण्यास व्यवस्थापनाला सांगितले...

समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव श्री.ऋषिकेश किंमतकर व शाळेच्या मुख्याध्यापिका साै.कविता जाैजाळ मँडम यांनी शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती तहसिलदार रमेश काेडापे यांना दिली... शाळेत असलेली अद्यावत संगणक प्रयाेगशाळा, डिजिटल व आर्कषक वर्गखाेल्या, मुलांना डिजिटल साक्षर करण्याकरीता व आनंददायी शिक्षणाकरिता शाळेचे सुरु असलेले विविध उपक्रम, महाराष्ट्र शासनाच्या 'माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धेत शाळेनी पटकाविलेले बक्षिस, नुकतिच शाळेनी शाळेतील बालवैज्ञानिकरिता आयाेजित केलेली विज्ञान प्रर्दशनी अशा विविध उपक्रम व भविष्यात आनखी सुरु करन्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली... तेव्हा या सर्व शाळेतर्फे विद्यार्थांना देण्यात येणार्‍या भौतिक व शैक्षणिक सुविधा व शाळेची पटसंख्या पाहुन तहसिलदार श्री.रमेशजी काेडापे यांनी समाधान व्यक्त केले... शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक विद्यार्थांप्रती घेत असलेली मेहनत व समर्थ शिक्षण मंडळाचे विद्यार्थांना सर्व भाैतिक सुविधायुक्त चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देत असल्याबद्दल कौतुक तथा अभिनंदन केले... याप्रसंगी ज्ञानदिप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.गजेंद्रजी चाैकसे, समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रसाद किंमतकर, सचिव श्री.ऋषिकेश किंमतकर, सहसचिव श्री.सारंग किंमतकर, समर्थ हायस्कुल च्या प्राचार्या साै.ममता लाेखंडे मँडम, समर्थ काँन्व्हेटच्या प्राचार्या कु.रेणुका घाेष मँडम, अनील वाघमारे उपस्थित हाेते....

Post a Comment

Previous Post Next Post