महाराष्ट्र वेदभुमी

किल्ले द्रोणागिरी स्वच्छता अभियानाने राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी.


 उरण- अजय शिवकर : रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग मागील पाच वर्षापासून शिवजन्मोत्सव दिनांक १८ व १९ फेब्रुवारी रोजी साजरा करत आहे... आणि हा जन्मोत्सव करंजा येथील डोंगरावर  किल्ले द्रोनागिरी  साजरी करतात... याही वर्षी शिवजयंतीच्या पूर्वतयारी चा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेत त्यांच्या जन्मदिनी गडावर स्वच्छता मोहीम करून त्यांना मानाचा मुजरा देण्यात आला... यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज मात्रे  सह सर्व सदस्य एकत्रित आले होते. आणि त्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजे पर्यंत गडावर स्वच्छता मोहीम राबवली गेली... या मोहिमेमध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे पुढील कामे करण्यात आली... गडावर उगविलेली अनावश्यक काटेरी झुडपे आणि वनस्पती काढून टाकली... गडावरील प्लास्टिक आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली, शिवजन्मोत्सवाच्या   दिवशी मिरविल्या जाणाऱ्या पालखीसाठी वहिवाट केली, कार्यक्रमाचे स्थळ आणि जेवण बनवतो त्या जागेची सफाई केली, गडावर येणाऱ्या महिलांसाठी तयार केलेल्या बाथरुमची डागडुजि करण्यात आली... ही सर्व काम केल्या नंतर गडावर चुलीवर बनवलेल्या  गरमागरम डाळ खिचडी या भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला...  आणि सर्व दुर्ग मावळे संध्याकाळी चारच्या सुमारास छत्रपती शिवरायांचे नाव घेत गडावरून परतीच्या प्रवासाला लागले... एकंदरीत दिवसभरातील गडावरीलं स्वच्छता मोहीम छत्रपती शिवरायांच्या नाम घोषात आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या नामघोषात मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आली... या दिवसभरातील स्वच्छता मोहिमेकरता दुर्गा मावळा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच इतरही काही आजूबाजूच्या गावातील शिवभक्त उपस्थित राहून ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post