महाराष्ट्र वेदभुमी

चोंढी राजिप शाळेला किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांची भेट,


शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची स्वतः जेवण करत केली पाहणी

सोगाव - अब्दुल सोगावकर : सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी एक प्रथम जागरूक नागरिक म्हणून चोंढी येथील राजिप शाळेत अचानक दुपारच्या वेळी भेट देऊन शालेय पोषण आहाराची पाहणी करत स्वतः विद्यार्थ्यांसोबत बसून आहाराचे सेवन केले. याबाबत सरपंच पिंट्या गायकवाड यांचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कौतुक केले आहे...

   सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच हे आपल्या कर्तव्याबाबतीत नेहमीच जागरूक असतात, आपल्या पंचायत हद्दीत सुरू असलेली लोकोपयोगी विकासकामे योग्य पद्धतीने व योग्य दर्जाने होत आहेत की नाही याबाबत सातत्याने पाठपुरावा व पाहणी करून ते पूर्णतः मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असतात. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा आदी कार्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. सरपंच पिंट्या गायकवाड यांनी शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी चोंढी येथील राजिप शाळेत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसह इतर सर्व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबतीत शाळेत अचानक भेट देत शिजविण्यात आलेला पोषण आहार नक्कीच पोषक व दर्जाचे आहे का ? याची खात्री करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत बसून आहार सेवन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा दर्जा नेहमी योग्य पद्धतीने देत आहेत की नाही याबाबत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, आहार शिजविणाऱ्या मदतनीस महिला यांच्यासोबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली...

फोटो लाईन :चोंढी येथील राजिप शाळेत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी अचानक भेट देत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या पोषण आहाराची स्वतः सेवन करत माहिती घेताना,

Post a Comment

Previous Post Next Post