महाराष्ट्र वेदभुमी

युको बँकचा ८३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा



सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- युको बँकेचा ८३ स्थापना दिवस सोमवारी (ता.६ ) उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी स्थापना दिनानिमित्त नगरधनच्या सरपंच सौ. मायाताई अरुण दमाहे, सी.आर.पी. सीमाताई सुरेंद्र बिरणवार व प्रीतीताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी अभिनय पुराणिक (प्रबंधक युको बँक नगरधन), निग्राध नारनवरे (सहाय्यक प्रबंधक युको बँक नगरधन), सुरज मेश्राम, नत्थू वासनिक, संजय बोरकर, नितीन तरारे, सौ. अनिता वाघमारे, सौ. रुपवंती दमाहे व ग्राहक खातेदार उपस्थित होते. या बँकेची स्थापना घनश्यामदास बिर्ला यांनी ६ जानेवारी १९४३ मध्ये केली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. झालेल्या बँकेचे यश हे सर्व बँकेचे विश्‍वासू खातेदार व सेवक यांचे आहे. बँकेच्या काम करत असताना प्लॅनिंग व मॅनेजमेंट या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे... जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवकांचे व खातेदारांचे बँकिंग पलीकडचे नाते असल्यामुळे खातेदारांना जिल्हा बँकेत व्यवहार करण्यास सोपे जाते... त्यामुळे बॅँकेचा नावलौकिक वाढत आहे...

अभिनय पुराणिक वरिष्ठ प्रबंधक म्हणाले, की बँकेचा रोड मॅप तयार करणे गरजेचे आहे. बँकेच्या सर्व सेवकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे. बँकेच्या प्रगतीकरिता सर्व सेवकांनी बँकेचे प्रॉडक्ट विकण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात बँकेचे वरिष्ठ लिपिक संजय बोरकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post