पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्यांना लायन अलंकार खांडेकर यांच्या सौजन्याने व कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले...
कोलाड विभाग परिसरात गेली चार वर्ष ग्रामीण भागात ही सेवाभावी संस्था विविध उपक्रम राबवत असून लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,तसेच गरीब गरजू व्यक्तींना डोळे तपासणी शिबिर आयोजित करत त्यांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देत विविध प्रकारची मदत करत आहेत.तसेच तेथील दुर्लभ समाज घटकाला आरोग्यसेवा तसेच काही विविध उपक्रम राबवत असतात.याच अनुषंगाने कोलाड लायन्स क्लबचे बोर्ड ऑफ डायरेक्टर लायन अलंकार खांडेकर यांच्या विशेष सौज्यन्यातून संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप,माजी अध्यक्ष नरेश बिरगावले,अध्यक्ष डॉ मंगेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड लायन्स क्लबच्या वतीने येथील विद्यार्थी वर्गाला थंडीच्या दिवसांत या उबदार पांघरूनाचे वाटप करण्यात आले...
यावेळी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ श्यामभाऊ लोखंडे, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार राजेंदर कप्पु,माजी खजिनदार तथा बोर्ड ऑफ डायरेक्टर नंकुमार कळमकर,लायन दिलिप मोहिते,पुगाव केंद्र प्रमुख वैशाली सलागरे, शाळेचे मुख्याध्यापक मारोतराव कोरडे,शिक्षिका शोभा खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोसावी,महादेव जाधव, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ संजना जाधव,पालक सौ प्रणिता जाधव सह आदी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते...
