रामटेक येथे तिन दिवसीय पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवचा थाटात समारोप
महोत्सवाला लोकांची अलोट गर्दी
प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा पत्रकारांना फटका, केली नारेबाजी
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-पर्यटन संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामटेक पर्यटन व सांकृतिक महोत्सवात शुक्रवारी गायक सुखविंदर सिंग यांच्या गितांबर थिरकत प्रेक्षक, ओत्यांनी आनंद घेतला. एकुणच कलावंतांसह या महोत्सवाच्या आयोजनात मोलाचा वाटा असणारे ना. आशिष जयस्वाल यांनी लोकांची मने जिंकल्याचे चित्र दिसुन आले...
रामटेक पर्यटन व सांस्कृतीक महोत्सवात दि.२२ जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा गायनाचा कार्यक्रम तर बिंदू दारासिंग, पुनीत इस्सार, सिद्धांत इस्सार यांच्या महानाट्याने प्रेक्षकांना अक्षरशा मंत्रमुग्ध केले. तर २३ जानेवारीला सुप्रसिद्ध गायक उदीत नारायण यांनी आपल्या ' पहला नशा पहला खुमार ' सारखी अनेक गित सादर करून उपस्थित तरुणाईला प्रेमाचा नशा चढविला तर याच दिवशी महोत्सवाला उदीत नारायण यांच्या विनंतीवरून महोत्सवाला सरप्राईजरित्या भेट देणारे मुलगा आदित्य नारायण यांच्या गितांवर प्रेक्षकांसह अख्खी तरुणाई थिरकली. यानंतर २४ जानेवारीला सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी त्यांच्या स्वतः म्हटलेल्या गितांसह ' ओल्ड इज गोल्ड ' गितांचे गायन केले.
दरम्यान यावेळी संपुर्ण नेहरू मैदानावरील हजारो प्रेक्षक मंडळींनी आपल्या जागेवरच समुह करून मनसोक्त नृत्य केले. विशेष म्हणजे यावेळी बच्चेकंपनीसुद्धा मागे नव्हती, त्यांनीही मनसोक्त नृत्यु करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते... यात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायकल स्पर्धा, पॅरामोटर, माती कला स्पर्धा, स्केटींग स्पर्धा, फुड फेस्टीवल, हॉट एअर बलून, नौका बोटींग स्पर्धा आदींचा समावेश होता. अनेकांनी यात आपला सहभाग नोंदविला. तसेच महोत्सवादरम्यान नेहरू मैदानाच्या सभोवताल छोट्या मोठ्या दुकानदारांसह महिला बचत गटांचे भव्य स्टॉल लागले होते. गेल्या तिन दिवसांत यांना मोठा रोजगार उपलब्ध झालेला होता...
महोत्सवाला ढिसाळ नियोजनाचे गालबोट, पत्रकारांनी केली नारेबाजी
महोत्सवात व्हिव्हीआयपी कक्ष, व्हिआयपी कक्ष तथा पत्रकार कक्ष स्वतंत्ररित्या तयार करण्यात आले होते. गेल्या महोत्सवासारखी पासेस ची सुविधा यावेळी नव्हती तर महसुल विभागाकडून पत्रकारांसाठी एक विशेष आय कार्ड तयार करून महोत्सवात बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.
२३ जानेवारीला उदीत व आदित्य नारायण यांच्या गित गायनाच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकार मंडळी त्यांच्या कक्षात येण्यापुर्वीच इतर नागरीकांनी हा कक्ष फुल भरून होता. तेव्हा पत्रकारांवरच उभे राहण्याची वेळ येऊन ठेपली होती. तरुण पत्रकारांसह काही वयोवृद्ध पत्रकारांवरही उभे राहण्याची वेळ आली. ही अपमानास्पद वागणूक पाहुण पत्रकारांचा संताप अनावर झाला व त्यांनी ढिसाळ प्रशाषणाविरोधात जोरदार नारेबाजी केली. हे चित्र पहाता महसुल विभाग व पोलीस प्रशाषणाचा एकच गोंधळ उडाला. पत्रकारांच्या सामुहीक लढ्यापुढे प्रशासन झुकले व शेवटी त्यांची बसण्याची व्यवस्था व्हिव्हीआयपी कक्षात करून देण्यात आली. तसेच पत्रकारांनी केलेल्या गोंधळामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ जानेवारीला पत्रकारांच्या कक्षापुढे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला व त्यांच्या बसण्याचे योग्य नियोजन केले...
चार कोटींच्या निधीत ढिसाळ नियोजन
महसुल विभागाने पत्रकार परिषदेत सदर महोत्सवाचा अपेक्षीत खर्च चार कोटी रुपयांचा सांगीतला होता. मात्र एवढया मोठया निधीपुढे प्रशासनाने राजकिय, पदाधिकारी, पत्रकार तथा नागरीकांसाठी केलेली बसण्याची व्यवस्था तोटकी वाटली. मैदानाच्या जवळपास पाव भागात नागरीकांच्या बसण्यासाठी खुर्च्याच ठेवल्या नव्हत्या त्यामुळे अनेक लोकं तथा विशेषतः महिलांचे जत्थे खाली तर मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर बसुन दिसुन आले तर बहुतांश लोकांना उभे राहुनच कार्यक्रम नाईलाजास्तव पहावा लागला... एवढेच नाही तर व्हिव्हीआयपी कक्षातही काही राजकिय नेत्यांवर बसण्यासाठी बाकाची व्यवस्था होत पर्यंत बाजुला उभे राहाण्याची वेळ आली होती.. तसेच मैदानाच्या सभोवताल ठिकठिकाणी मुत्रीघराची व्यवस्था करणे गरजेचे होते मात्र त्याचाही अभाव दिसुन आला... यावेळी अनेकांची पंचाईत झाली... तेव्हा प्रशाषणाने कोटींच्या निधीत ढिसाळ नियोजन केल्याचे दिसुन आले...