महाराष्ट्र वेदभुमी

नागरिकांची डोकेदुखी; मुरुड शहरात रस्त्यावर उभ्या चार चाकी वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

शहानवाज मुकादम/रोहा

मुरुड : जंजिरा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून येथील परिसर पाहण्यासाठी व समुद्राचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक मुरुडमध्ये येतात... 

मुरुड शहर हे नबाब कालीन नियोजनबद्ध शहर आहे, शहरामध्ये प्रशस्त रस्ते, शाळा, गटारे अशा सुविधा होत्या तसेच पूर्वीच्या बांधकामातील शासकीय इमारती या अजूनही प्रेक्षणीय स्थळे आहेत...

 जसा जसा विकास होत गेला, तशी तशी लोकसंख्या पण वाढत गेली... परिणामी सिमेंट जंगल उभे राहीले मोठ्या मोठ्या इमारती उभे राहू लागल्या परंतु प्रशासनाने इमारती उभारण्यासाठी भविष्याचा विचार न करता परवानग्या दिल्या असून एकेका घरात दोन-दोन वाहने, परंतु वाहन पार्क करण्यासाठी जागाच शिल्लक नाही... परिणामी ते वाहने  रस्त्यावरती पाहिजे तितके दिवस उभे राहते...त्यामुळे नागरिकांना ट्रॅफिक जामचा प्रचंड ताप सहन करावा लागतो...

    पोलीस यंत्रणा येते आणि दंड आकारते... परंतु वाहन जैसे थे,शासनाने पूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून सदर कॅमेरामध्ये या गाड्या दिसतात की नाही तेच लक्षात येत नाही.... शासकीय कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करत वाहने पाटी लाऊन रस्त्यात उभी ठेवतात तरी प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी... अशी नागरिकांची अपेक्षा आहे..


Post a Comment

Previous Post Next Post