प्रतिनिधी (नागेंद्र म्हात्रे): हितवर्धक सामाजिक ग्रामीण संस्था दादर, ता- पेण, जि- रायगड या संस्थेतर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी स्वर्गीय हिरू धर्मा ठाकूर इंग्लिश स्कूल व G.H.T. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज दादर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्च 2025 च्या परीक्षेसाठी प्रश्नसंच-2025 चे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष व स्कूलचे संस्थापक श्री जी एच. ठाकूर - सर, सारडे विकास मंच चेअध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर, श्री निवास गावंड सर, कोरियोग्राफर् मास्टर श्री सचिन पाटील सर, इ. दहावीचे विद्यार्थी आणि एच.डी.टी.इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, टीचर व इतर यांच्या उपस्थितीत प्रश्न संचाचे प्रकाशन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अगोदर प्रास्ताविक मध्ये जी.एच. टी.सायन्स कॉलेज विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व इयत्ता अकरावी सायन्सला त्यांना व त्यांच्या पालकांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले. यासाठी कॉलेजची वैशिष्ट्ये व इतर माहिती विद्यार्थ्यांना प्रास्ताविक मध्ये दिली आपले कॉलेज आपल्यासाठी आहे त्याला नावं लौकिकाला आणण्यासाठी आपणच सहकार्य केले पाहिजे असे त्यांना विशद केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या, सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सरांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीचे साठी खरतर परिश्रम करण्यासाठी प्रयत्न करावे व शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे श्री निवास गावंड सर यांनी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्याचप्रमाणे श्री सचिन पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना परिस्थिती शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक देशभक्तीपर गीत डान्स करून सर्वांना मंत्र मुक्त केले कार्यक्रमाचे स्वागत , आभार आणि सूत्रसंचालन श्री ठाकूर जी. एच. यांनी केले....
