महाराष्ट्र वेदभुमी

काॅंग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या हस्ते राजस्थान बेस्ड VK इंडस्ट्रीज येथे ध्वजारोहण

माणगाव :- (नरेश पाटील) कोकणातील नामांकित काँग्रेस नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण राजस्थान बेस्ड VK इंडस्ट्रीज येथे केले.  या वेळी व्ही. के. इंडस्ट्रीजच्या मालकांसोबत त्यांचा मित्र परिवार व शेकडो कामगार उपस्थित होते. राजाभाऊ ठाकूर यांनी यापूर्वीही मध्यप्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून काम केलेले आहे तसेच  समाजसेवेच्या माध्यमातून ते देशभरात भेटी देत असतात...


काल सदर ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय सण 26 जानेवारी दिनी "गणराज्य दिनाचा महोत्सव ध्वजारोहण,   देशभक्ती पर भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम असे एक ना अनेक उपक्रम या प्रसंगी झाले. 

दरम्यान व्ही. के. इंडस्ट्रीज तर्फे प्रमुख पाहुणे राजाभाऊ ठाकूर यांचे  शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post