सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम अजून बाकी राहिले आहे. यामुळे धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे...
खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पूर्वी ही तारीख १५ डिसेबर होती. ना. आशिष जयस्वाल यांनी ३१डिसेंबरला तारीख वाढवून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना देवून मुदतवाढीची मागणी केली होती. मुदतवाढ मिळाल्याने ना.जयस्वाल यांच्या प्रयत्नांना यश आले...
लोकांची ही मागणी विचारात घेता ना.जयस्वाल यांनी ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ करण्यासंबंधी पञ दिले. ३१ डिसेंबरला राज्याचे उपसचीव राजश्री सारंग यांनी पणन मंडळाला पत्र देवून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत देत नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देत असल्याचा आदेश दिला. निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा आता शेतकऱ्यांना फायदा होणार असून धान मालाला चांगला भाव मिळणार आहे...
शेतकऱ्यांना होणार फायदा
धन खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास हमीभावानुसार माल खरेदी केला जात असतो. यासाठी या पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना खासगी विक्री केंद्रावर मिळेल त्या दरात धान विक्री करावी लागत असते. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करणे बाकी राहिले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे...