महाराष्ट्र वेदभुमी

देवलापार पोलिसांची धडक कार्यवाही ; गांजा विक्रेत्यास अटक


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- देवलापार या भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे रॅकेटच पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे...पोलीस पथकाने राष्ट्रीयमहामार्ग ४४ वरील मोरफाटा दरगाह जवळील एका दुकानात मंगळवारी दुपारी धाड टाकत दुकानातून १०२ ग्रँम गांजा जप्त केला असून गांजा विक्रेत्या दुकानदारास अटक करण्यात आली...

हलीम उर्फ रंगा फरीद शेख (४३) रा. खवासा, जिल्हा सिवनी, मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे...

हलीमने मोरफाटा येथील दरगाह परिसरात दुकान थाटले होते... गुप्त माहितीच्या आधारे पोलीस  उपनिरीक्षक अमोल तांबे आणि त्यांच्या पथकाने मोरफाटा दरगाह येथे हाईवे लगत असलेल्या दुकानातुन गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती... त्यामुळे पोलिसांनी धाड टाकून त्याच्या दुकानाची झडती घेत त्यात पोलिसांच्या हाती एका पिशवीत १०२ ग्रॅम गांजा आढळून आयाने पोलिसांनी गांजा जप्त करत आरोपी हलीम शेख अटक केली... गांजा मालाची अंदाजे किंमत 1020 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले...

 सदर प्रकरणी देवलापार पोलिसांनी हलीम उर्फ रंगा फरीद शेख यांना अटक करण्यात असून त्यांच्यावर कलम ८ (के), २० (बी) (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे सह स.पो.नि नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली...

Post a Comment

Previous Post Next Post