महाराष्ट्र वेदभुमी

आणखी किती बिबट्यांचा होणार अंत?


अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटयाच्या मृत्यू

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-  तालुक्यातील देवलापार वनविभाग वनपरीक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील कांद्री माईन गोपालनगर परिसरात या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट (मादी )चा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२९) सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली...

देवलापार परिसरात वाघ व बिबट्याचा वावर आहे... सकाळी अज्ञात वाहणाने रस्ता ओलांडत असताना बिबट मादीला जबर धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त  करण्यात येते आहे... घटनेची माहिती मिळताच वन परीक्षेत्र अधिकारी अनिल भगत सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहचले...

बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह रामटेक येथे आणण्यात आले... बिबट्याचे वय दीड वर्ष असल्याचा अंदाज आहे... वनविभागाने वन्यजीव (संरक्षण ) कायदा १९७२ च्या कलम ३९, ९ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई अनिल भगत व वन कर्मचारी करीत आहे..

चिंतेचे वातावरण

जिल्ह्यातही वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याच्या घटना नेहमी घडतात... यापूर्वी २०२२ मध्ये नागपूर जिल्ह्यात अशा घटना घडल्याने पशुप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण होते... २०२२ मध्ये नागपूर वन विभागाअंतर्गत देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वन परिक्षेत्र येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या...

वन्य प्राण्यांचे संरक्षण

एकीकडे वन्यप्राण्याचं जतन करण्याकरता प्रयत्न होताहेत तर दुसरीकडे वन्यविभाग कुठलीही काळजी घेत नसल्याचं बिबट्याच्या मृत्यूवरून दिसून येत आहे. ..नागपूर-जबलपूर महामार्गावर आतापर्यंत अनेक बिबटयाचा अपघातात अंत झाला आहे... तेव्हा वनविभागाने त्याच्या क्षेत्रात पानवठे तयार करणे तसंच रस्ते ओलांडून वाघ, बिबट व अन्य प्राणी येऊ नये यासाठी सुरुक्षा भिंत किंवा जाळ्या लावणे गरजेचे आहे... तेव्हाच प्राण्याचे अपघात व पर्यायाने मृत्यू थांबतील...

Post a Comment

Previous Post Next Post