महाराष्ट्र वेदभुमी

तुरीवरील मर रोगाला कसे रोखाल?


तुरीचा उत्पादनात घट होण्याची शक्यता

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :-अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना आंतरपीक असलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहेत...यंदा पाऊसमान चांगले असल्याने सोयाबीन व आंतरपीक असलेले पीक तरारून वर आल्याने शेतकरी आनंदित होते...

परंतु गेला शुक्रवारी पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनीत भरपूर ओलावा निर्माण झाला... त्याचा फटका बसत तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे... विभागात काही ठिकाणी तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे... तूर पीक सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे...तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो... हा रोग फ्युजारियम उडम बुरशीमुळे होतो... शेतकरी अस्मानी त्याच्यासमोरील संकटांचा ग्राफ दिवसेंगणीक फुगतच चाललेला आहे...

      तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील तुर पिक पाहिले असता ते शेंड्यापासून बुडापर्यंत वाळल्यासारखे झाले आहे... कारणमिमांसा केली असता तुरपिकाला मररोगाने गिळंकृत केले असल्याचे समोर आले... जवळपास २५ % शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण शेतात तुरपिक पेरले होते तर काहींनी शेताच्या धुऱ्यावर लावले होते... उल्लेखनिय बाब अशी की शेतकरीवर्ग या पट्ट्यात धानपिक मोठ्या प्रमाणात तर तुरपिक अत्यल्प प्रमाणात व तेही धुऱ्यावर घेत असल्याने त्यांच्या सातबाऱ्यावर तुरपिकाची नोंदच नाही, फक्त धानपिकाचीच नोंद आहे...तेव्हा तुरपिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याचा प्रश्नच उठत नाही...ही चिंता सुद्धा शेतकऱ्यांना भेडसावु लागलेली आहे... याबाबद स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधला असता आम्हाला तुरपिकाच्या नुकसान भरपाई बाबत शासनाकडून पंचनामा घेण्याचे तसे काही अजूनही आदेश आलेले नाही पण येण्याची शक्यता आहे आम्ही पाठपुरा केलेला आहे असे सांगण्यात आले...

तुरपिक भरून काढते नुकसानीची पोकळी

हा भाग धानपिकाचा भाग म्हणून ओळखला जातो... या पट्टयात कास्तकारांकडून धानपिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते... मात्र अस्मानी, सुल्तानी तथा नैसर्गिक संकटांच्या कचाट्यात शेतकऱ्यांचे हे धानपिक सापडल्यावर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते... तेव्हा जी नुकसानीची पोकळी निर्माण होते, ती पोकळी या तुरपिकापासुन मिळणाऱ्या मिळकतीतुन निघत असते... आणि जेव्हा धानपिक आणि तुरपिक हे दोन्ही सुलभतेने निघुन बाजारपेठेपर्यंत जात असते त्यावेळी शेतकऱ्यांसाठी ' सोने पे सुहागा ' अशी स्थिती होत असते...

Post a Comment

Previous Post Next Post